डॉ. श्री बालाजी तांबे Santulan Senses kit

निरोगी शरीर आणि
पंचेंद्रिय स्वास्थ्य

डॉ. श्री गुरु बालाजी तांबे यांच्या
विचारप्रणालीतून

5 Gateways. One Ritual.

सुरुवातीला एक प्रश्न

आपण आपल्या पंचेंद्रियांची काळजी घेतो,
की फक्त ती व्यवस्थित काम करत आहेत ना,
एवढंच पाहतो?

आपली इच्छा

आपल्याला आयुष्य
भरभरून जगायचं असतं!

यशसमाधानआनंद

आपल्या माणसांसोबत छान वेळ, आवडत्या गोष्टी, निसर्गाचा आनंद.

जीवन अनुभवण्याची क्षमता

ही क्षमता आपल्याला मिळते आपल्या पंचेंद्रियांमधून.

डोळेSight · पाहणे
कानHearing · ऐकणे
नाकSmell · गंध घेणे
जीभTaste · चव घेणे
त्वचाTouch · स्पर्श अनुभवणे

पंचेंद्रिय

केवळ शरीराचे अवयव नाहीत, तर जगाशी जोडणारी जीवनाची प्रमुख द्वारं.

आपल्या आठवणी, भावना, विचार आणि अनुभवांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांची काळजी घेणं म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता जपणं.

आयुर्वेदात इंद्रिय म्हणजे

“

विशिष्ट प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे इंद्रिय.

डोळे असणेदृष्टीने अनुभव घेणे
कान असणेलक्षपूर्वक ऐकणे

ऐकू येणे

Hearing

आवाज कानावर पडणे.

  • सहज
  • नकळत
  • बाहेरून

लक्षपूर्वक ऐकणे

Listening

तो आवाज लक्षपूर्वक समजून घेणे.

  • सजग
  • जाणीवपूर्वक
  • आतून

अशीच जागरूकता आणि जाणीव आपल्या सर्व इंद्रियांमध्ये असणे आवश्यक आहे.

सुश्रुतसंहिता · आरोग्याची व्याख्या

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधीयते॥

दोष, अग्नी, धातू आणि मल यांच्या क्रिया संतुलित असण्याबरोबरच आत्मा, इंद्रिये आणि मन प्रसन्न असणे म्हणजे स्वास्थ्य.

आरोग्य म्हणजे

फक्त आजार नसणे नव्हे.

१

शरीराची
कार्यक्षमता

२

मनाची
प्रसन्नता

३

इंद्रियांची
संवेदनशीलता

३

भाग ३

पंचेंद्रियांचा आपल्या मनावर आणि भावनांवर परिणाम

आपण दिवसभर कितीतरी गोष्टी पाहतो, ऐकतो, अनुभवतो. त्यांचा मनावर खूप खोलवर परिणाम होतो.

छोट्या गोष्टी, मोठा आनंद

  • आईचा प्रेमळ स्पर्श
  • पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध
  • सूर्योदयाच्या रंगछटा
  • पक्ष्यांचा किलबिलाट
  • वाफाळलेल्या चहाचा कप

अनुभव आणि आठवणी

एखादं गाणं ऐकलंजुन्या आठवणी जाग्या होतात
एखादा सुगंध आलालहानपण आठवतं
एखादा फोटो पाहिलाआनंदाचा क्षण पुन्हा जगतो

इंद्रियांचे अनुभव त्या क्षणापुरते मर्यादित नसतात; ते स्मृतींशी आणि भावनांशी जोडले जातात.

याच्या उलट अनुभवही येतात

अंधारात पडलेली दोरी दिसली, तरी क्षणभर साप असल्याचा भास होतो.

एखाद्याने मनाला लागेल असं बोललं, तर ते पटकन विसरत नाही.

बाहेरून मिळालेला अनुभव मनात साठतो आणि पुढे आपल्या प्रतिक्रियांवर परिणाम करू शकतो.

चरकसंहिता · इंद्रियोपक्रमणीय अध्याय

इंद्रियेमनबुद्धीआत्मा

इंद्रियांना मिळालेला अनुभव आणि मनाने त्याला दिलेला अर्थ, दोन्ही महत्त्वाचे.

आपण आपल्या इंद्रियांना काय देतो, हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपण त्या अनुभवांकडे कसं पाहतो, हेही महत्त्वाचं आहे.

४

भाग ४

इंद्रियांचा अतिरेक, अभाव आणि चुकीचा वापर

चरकाचार्यांनी सांगितलेल्या तीन महत्त्वाच्या चुका.

इंद्रियांच्या वापरातील तीन चुका

१

अतियोग

इंद्रियांचा अतिरेकी वापर.

२

अयोग

आवश्यकतेपेक्षा कमी किंवा अभावाने वापर.

३

मिथ्यायोग

इंद्रियांचा चुकीच्या पद्धतीने वापर.

आजच्या जीवनातील उदाहरणं

अतियोग अयोग मिथ्यायोग डोळे सतत स्क्रीन पाहणे आवश्यक दृश्यानुभव आणि विश्रांती न मिळणे अयोग्य प्रकाशात सतत वाचन करणे कान मोठ्या आवाजात हेडफोनवर संगीत श्रवणाचा पुरेसा अनुभव न मिळणे त्रासदायक आवाजाचा संपर्क

नाक · जीभ · त्वचा

नाक

धूर, धूळ, प्रदूषण आणि तीव्र गंध.

जीभ

अति तिखट, खारट, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ; चवीच्या मागे लागून योग्य आहाराकडे दुर्लक्ष.

त्वचा

अयोग्य स्पर्श, अतिउष्णता, अतिथंडी किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

लक्षात घ्यायला हवं

इंद्रियांमध्ये दोष म्हणजे नेहमीच आजार नव्हे; त्यांची संवेदनशीलता, कार्यक्षमता आणि योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होऊ शकते.

तंत्रज्ञानप्रदूषणधावपळअपुरी झोपसततची उत्तेजना

आपण या इंद्रियांची काळजी कशी घेणार?

५

भाग ५

इंद्रियसंयम

स्वतःच्या जीवनाची सूत्रे स्वतःकडे ठेवणे.

इंद्रियसंयम म्हणजे

  • इंद्रियांना त्रास देणे नव्हे.
  • त्यांना दाबून ठेवणे नव्हे.
  • जगातील आनंदापासून दूर जाणे नव्हे.

इंद्रिये आपल्या ताब्यात असणे.

आपल्या प्रत्येकाचा अनुभव

रात्री झोपण्याची वेळ झाली आहे. पण मोबाईलवर एक छान व्हिडिओ दिसतो…

आपल्याला माहीत असतं की आता थांबायला हवं. तरीही आपण थांबत नाही.

इथे मदत करणार कोण?

आपली बुद्धीआपली जाणीवआपला निर्णय
११:४५
“फक्त हा एक पाहतो…”
मग दुसरा…
मग तिसरा…

चरकसंहिता · सूत्रस्थान, अध्याय ११

मन आणि इंद्रियांचे योग्य व्यवस्थापन

इन्द्रियाभिग्रह

इंद्रियांवर नियंत्रण. काय पाहायचे, ऐकायचे, अनुभवायचे याबद्दल सजग असणे.

मनोनिग्रह

मन भरकटले तरी पुन्हा योग्य दिशेला आणणे.

ऊह

तर्क आणि अनुमानाने विचार करणे.

विचार

काय योग्य, अयोग्य, हितकारक किंवा अहितकारक आहे, याचे चिंतन.

योगशास्त्र · महर्षि पतंजली

अष्टांग योगाचा पाचवा टप्पा: प्रत्याहार

१यम२नियम३आसन४प्राणायाम५प्रत्याहार६धारणा७ध्यान८समाधी

संकटाची चाहूल लागताच कासव आपले अवयव कवचात ओढून घेते. तसेच, बाह्य विषयांच्या आकर्षणातून इंद्रियांना मागे घेऊन मनाच्या नियंत्रणात ठेवणे म्हणजे प्रत्याहार.

आजच्या भाषेत

दिवसभर जगाशी जोडलेले राहिल्यानंतर, काही वेळ स्वतःशी जोडले जाणे!

जग सोडायचं नाही. पण जगाच्या गोंगाटात स्वतःला हरवूनही जायचं नाही.

शांत बसणेश्वासाकडे लक्षमोबाईल बाजूला
६

भाग ६

आयुर्वेदाची तीन सुंदर सूत्रे

जीवनाचा आनंद घ्यायचा, पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने.

पहिले सूत्र

सात्म्येंद्रियार्थ संयोग

इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी योग्य, हितकारक आणि संतुलित संपर्क.

डोळ्यांना
योग्य दृश्यं

कानांना
योग्य आवाज

जिभेला
योग्य आहार

नाकाला
योग्य गंध

त्वचेला
योग्य स्पर्श

दुसरे सूत्र

बुद्धीचा योग्य वापर

आवडते म्हणून ती गोष्ट नेहमीच हितकारक असेल असं नाही.

गोड पदार्थ आवडतो म्हणून कितीही खायचा का?

व्हिडिओ पाहायला आवडतात म्हणून झोपेचा त्याग करायचा का?

आवड आणि आवश्यकता यातील फरक ओळखायला हवा.

तिसरे सूत्र

देश आणि कालानुसार आचरण

प्रकृतीवयऋतूपरिस्थिती
१८ वर्षांचा तरुण८० वर्षांची व्यक्ती
उन्हाळ्यातील दिनचर्याहिवाळ्यातील दिनचर्या

सगळ्यांसाठी एकच नियम नाही; स्वतःच्या गरजा ओळखून त्यानुसार वागावं.

७

भाग ७

पंचेंद्रियांची दैनंदिन काळजी

छोट्या सवयी, मोठा बदल.

रोजच्या छोट्या सवयी

डोळे
कान
नाक
जीभ
त्वचा

डोळे

  • स्क्रीनपासून नियमित विश्रांती द्या.
  • पुरेशी झोप घ्या.
  • आकाश, झाडं, हिरवळ पाहा; निसर्गाचा आनंद घ्या.

फक्त दिसणं नाही, तर काय पाहायचं हे ठरवणंही महत्त्वाचं!

कान

  • मोठ्या आवाजापासून संरक्षण; हेडफोनचा आवाज मर्यादित.
  • संगीत ऐका, पण शांततेचाही अनुभव घ्या.
  • दुसऱ्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकण्याची सवय ठेवा.

फक्त ऐकणं नाही, तर योग्य ते ऐकणं आणि समजून घेणं महत्त्वाचं!

नाक

  • स्वच्छ हवेत वेळ घालवा.
  • धूर, धूळ आणि प्रदूषणापासून शक्य तितके संरक्षण करा.
  • निसर्गातील सुगंध अनुभवायला शिका.

सुगंध अनुभवण्याची क्षमता हीसुद्धा जीवनातील आनंदाची देणगी आहे.

जीभ

  • ताजे, संतुलित अन्न नियमित वेळेत खा.
  • मोबाईल, TV न पाहता सावकाश जेवा.
  • केवळ चवीसाठी नव्हे, तर पोषणासाठी खा.

चवीचा आनंद घेताना आरोग्याचा विचार विसरू नका.

त्वचा

  • स्वच्छता राखा.
  • प्रकृती आणि ऋतूनुसार त्वचेची काळजी घ्या.
  • योग्य अभ्यंगाला दिनचर्येत स्थान द्या.

स्पर्श ही केवळ शारीरिक संवेदना नाही, तर भावनिक जवळिकीचीही भाषा आहे.

सर्व इंद्रियांसाठी

  • सकाळच्या स्वच्छ हवेत फिरणे
  • नियमित चालणे आणि व्यायाम
  • योगाभ्यास आणि प्राणायाम
  • नियमित ध्यान
  • सकाळी आणि रात्री ५–१० मिनिटे ॐकार साधना

मोठ्या बदलांपेक्षा छोट्या सवयींमधील सातत्य अधिक महत्त्वाचं.

८

भाग ८

संतुलन सेन्सेस किट

आरोग्याची जाणीव, रोजच्या जीवनात.

आयुर्वेद म्हणजे

केवळ औषधोपचार नाहीत.

जीवन जगण्याची कला.

आजारी पडल्यानंतर उपचार करतोच; पण आजार होण्यापूर्वीच आरोग्याची जाणीवपूर्वक काळजी घेण्याची सवय लावली पाहिजे.

डॉ. श्री गुरु बालाजी तांबे यांच्या विचारप्रणालीतून प्रेरित

किटमध्ये

पाच इंद्रियांसाठी, पाच तयारी.

Sunayan

डोळ्यांसाठी

सुनयन तेल

Sumukh

जीभ आणि मुखासाठी

सुमुख तेल

Nasyasan

नाकासाठी

नस्यसॅन

Brahmaleen

मेंदूच्या काळजीसाठी

ब्रह्मलीन तेल

Shruti

कानांसाठी

श्रुति तेल

गळ्याच्या वरस्वर्गाचा भाग
गळा · स्वर्गाचे द्वार
गळ्याखालचा भागपृथ्वी

ब्रह्मलीन तेल · मेंदूची काळजी

मेंदू आलेल्या अनुभवांची स्मृती साठवत असतो.

त्याच घटना पुढे घडल्या, की या स्मृतींवरून आपला प्रतिसाद तयार होतो.

डॉ. श्री बालाजी तांबे

निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि जागरूक बुद्धी यांचं संतुलन म्हणजे खऱ्या अर्थाने स्वास्थ्य.

श्री गुरुजी नेहमी म्हणायचे

“उत्तम आरोग्य हा माझा
जन्मसिद्ध हक्क आहे.”

९

भाग ९

सोम ॐकार साधना

पंचेंद्रियांना स्वतःकडे वळवण्याचा सुंदर अनुभव.

नाद

वाऱ्याचा आवाज, लाटांचा नाद, निसर्गातील ध्वनी…

ॐ हा केवळ उच्चार नाही.

ध्वनीचिंतनाचं तत्त्वसाधनेचा मार्ग

संस्कृत येण्याची आवश्यकता नाही; कोणत्याही भाषेची अट नाही. प्रत्येक जण सहज उच्चार करू शकतो.

श्री गुरुजींनी विकसित केलेली सोम ॐकार उपासना

अ·उ·म

ॐकारामध्ये या तीन ध्वनींचा अनुभव घेतला जातो.

साधना करताना

  1. स्थिर आणि सुखद आसनात ताठ बसावे.
  2. डोळे अलगद अर्धोन्मीलित ठेवावेत.
  3. सहज श्वास घ्यावा.
  4. ॐ म्हणताना श्वास हळूहळू बाहेर सोडावा.
  5. एकाच स्वरात, स्वतःला ऐकू येईल इतक्या उपांशु आवाजात ॐ म्हणावा.
  6. म्हटलेला ॐ लक्षपूर्वक ऐकावा.
  7. अ, उ, म या ध्वनींच्या अनुभवाकडे लक्ष द्यावे.

ॐकार साधना आणि पंचेंद्रिये

डोळे

बाह्य दृश्यांपासून विराम; लक्ष आत वळू लागते.

कान

स्वतःचा ॐकार आणि नंतरची शांतता लक्षपूर्वक ऐकणे.

नाक, श्वास

सहज श्वास आणि हळू उच्छ्वास; श्वासाबद्दल जागरूकता.

जीभ, मुख

अ, उ, म मधील हालचाली; वाणीबद्दल जागरूकता, शब्दांत संयम.

त्वचा, शरीर

मकाराचे गुंजन, कंपनं; शरीरात कुठे ताण आहे ते जाणवते.

ॐकाराचा प्रवास

ध्वनी
शांतता
ध्यान
आत्मचिंतन

स्वतःच्या श्वासाकडे, आवाजाकडे, शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देण्याची संधी.

सामूहिक ॐकार · २–३ मिनिटे

सुखद आसनात बसूया.

लक्ष स्वतःच्या श्वासाकडे वळवूया.

सहज श्वास घेऊया…
आणि हळूहळू ॐचा उच्चार करूया.

अ… उ… म…

आपल्या आवाजाकडे लक्ष देऊया.

आवाज संपल्यानंतरच्या
शांततेचा अनुभव घेऊया.

उच्चार स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजात

Santulan Senses kit with the five preparations

आयुष्य फक्त जगायचं नाही,
तर ते निरोगीपणे,
आनंदाने आणि पूर्णपणे

अनुभवायचं आहे!

धन्यवाद!
संतुलन सेन्सेस